व्हिडीओ लिंक : https://www.facebook.com/watch/?v=411741936209322
‘संपर्क’ ही लोकसमस्यांचं निवारण व्हावं यासाठी धोरणकर्त्यांकडे पाठपुरावा करणारी संस्था आहे. संपर्कने सुरू केलेला हा ब्लॉग. समस्यानिवारणासाठी आपल्या भोवताली सुरू असलेल्या उमेद वाढवणार्या प्रयत्नांची नोंद ठेवणारा. हा मजकूर शेअर करून इतरांचीही उमेद वाढवा. तसंच उमेद वाढवणारा मजकूर पाठवून या ब्लॉगसाठी योगदानही करू शकता.
Friday, 31 January 2020
खासगी शाळांतील ३० टक्के मुले लठ्ठ ! (बातम्या तुमच्या आमच्या मुलांच्या)
अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफ.डी.ए.) इंडियन डायबेटीस असोसिएशनसोबत केलेल्या संयुक्त सर्वेक्षणात हा प्रकार निदर्शनास आला आहे.
हल्ली धकाधकीच्या जीवनात आहार संतुलन ठेवणं कठीण होऊन बसलं आहे. त्यात शाळेतील लहान मुलं ही आलीच. ही शाळकरी मुलं फक्त शाळेतच जात नसून ते वेगवेगळे क्लासेस, ट्युशन्स व एक्स्ट्रॉ क्लासेसला जात असल्यामुळे ही मुलं घरातून बराचवेळ बाहेर असतात. त्यामुळेच बाहेर जे काही मिळेल, जे समोर असेल ते खातात. अश्यावेळी कमी वेळात जे खाता येईल, थोडक्यात भूक शमेल हेच लक्षात ठेऊन मुलं जंक फूडच्या आहारी जातात.
शाळा, कॉलेजमध्ये कॅण्टीनमधून चिप्स, तळलेले पदार्थ, पिझ्झा, बर्गर, चॉकलेट्स असे जंक फूडचे पदार्थ सहज उपलब्ध असतात. आणि असे चमचमीत पदार्थ कुणालाही सहजच आवडतात. यातून त्यांच्या पोषण गरजा भागवल्या जात नाहीत. एका सर्वेक्षणानुसार दिल्लीच्या शाळांमधील मुलांच्या लठ्ठपणाचे प्रमाण २००२मध्ये १६ टक्के होते तर २००६ मध्ये ते २४ टक्क्यांनी वाढले.
विद्यार्थ्यांच्या निरोगी आरोग्यासाठी कशा पद्धतीचा आहार आवश्यक आहे, याची माहिती पालकांना देणे आवश्यक आहे. त्यासाठी शाळास्तरावर नियुक्त होणाऱ्या समितीकडून ‘मास्टर शेफ’ स्पर्धांसह इतरही उपक्रम राबवून पालकांना, विद्यार्थ्यांना आवडेल असे नावीन्यपूर्ण खाद्यपदार्थ तयार करणे गरजेचे आहे.
- लता परब
बातमी लिंक : Nashik News: ‘जंक फूड’विरोधात विद्यार्थीप्रबोधन! - student awareness against 'junk food'! | Maharashtra Times - http://mtonline.in/qKGena/lmy
आमचा खारीचा वाटा
नुकतीच झालेली सावित्रीमाईची जयंती आणि आमच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त 10 सुकन्या खाती आमच्या वतीने पहिलं डिपॉजिट भरून काढण्यात आली. ही खाती कुसळंब व दाजी पेठ पोस्ट ऑफिस इथं काढण्यात आली. त्यामध्ये विविध सामाजिक व आर्थिक घटकातील कुटुंबांचा समावेश होता.
बऱ्याच वेळी परिस्थितीमुळे मुलींना उच्च शिक्षणापासून वंचित ठेवलं जातं, शिक्षणाचा खर्च परवडणारा नसल्यामुळे मधेच शिक्षण सोडून द्यावं लागतं. लातूर जिल्ह्यातील जढाळा येथील स्वाती पिटले प्रकरण व पंढरपूरमधील पॉलिटेक्निकचं शिक्षण घेणाऱ्या मुलीने आपल्या वडिलांना शिक्षणाचा खर्च परवडणारा नसल्याने परिस्थितीला कंटाळून केलेली आत्महत्या.
अशा घटना घडू नयेत म्हणून मुलींच्या आई- वडिलांना तिच्या लहानपणापासूनच तिच्यासाठी बचतीची सवय लागावी यासाठीचा आमचा हा छोटासा प्रयत्न. यामुळे मुलींकडे एक प्रकारचं ओझं म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन हा बदलणारा नाही. परंतु यामुळे तिला तिच्या गरजेच्या वेळी शिक्षणासाठी नक्कीच मदत होईल अशी आशा आम्ही बाळगतो.

- पूजा कांबळे, दत्ता चव्हाण
गांधीजींचं मोठेपण उलगडणार्या छोट्या गोष्टी: ३ (वाचक : सायली राजाध्यक्ष)
व्हिडीओ लिंक : https://www.facebook.com/watch/?v=878738262523408
तस्नीमच्या शाळेची गोष्ट
तस्नीम असद बॉम्बेवाला. शिक्षणाने आर्किटेक्ट. सर्वसामान्य गृहिणी. पहिल्या अपत्याच नाव ‘अस्मा’. अस्मासाठी मोठी स्वप्नं पाहणं सुरू झालं. ती अडीच वर्षांची झाली आणि इतर सामान्य मुलांपेक्षा ती वेगळं वागते आहे, सर्व सामान्य मुलांच्या आकलनापेक्षा अस्माची आकलन क्षमता कमी आहे हे तस्नीम यांना लक्षात यायला लागलं. लगेचच त्यांनी नागपूर-मुंबई अशा अनेक ठिकाणी अनेक डाँक्टरकडे अस्माला दाखवलं. पण तिला झालाय काय हे निश्चित कुणालाच सांगता येईना. या सगळयात प्रचंड पैसे खर्च झाला, पण आजाराचं निदान होईना. अस्मा सहा वर्षांची असताना मुंबईतल्या एका डॉक्टरांनी अस्माला Niemann Pick-type-C हा आजार असल्याचं सांगितलं. या आजाराचे भारतात केवळ ४ रुग्ण आहेत तर जगभरात २००. या आजारावर कुठलाही औषधोपचार उपलब्ध नाही. कारण त्यावर फारसं संशोधनच झालेलं नाही. या आजारात रुग्णाचा मेंदू हळूहळू क्षीण होत जातो व एकदिवस काम करणं बंद करतो. असे रुग्ण फार तर २०-२५ वर्षे जगतात.
स्वतः मुलीच्या मृत्यूचं वय माहित असलेल्या आईला काय वाटत असेल हे शब्दात सांगणं कठीण. अशा परिस्थितीत सामान्य पालक खचून जातील. आपल्याच नशिबात असं मूल का? असा दोष स्वतःला देत राहतात. सर्वथा मानसिक निराशा येते पण तस्नीमने या परिस्थितीतून जात स्वतःला व परिवाराला सांभाळलं, सावरलं. हिंमत बांधली, अस्मा आहे तेवढा काळ सर्वोत्तम स्थितीत तिचा सांभाळ करायचा तिने निर्धार केला. इतक्यावरच तस्नीम थांबलेल्या नाहीत.
‘अस्मा’च्या असाध्य आजाराबद्दल कळल्यावर तिची योग्य काळजी घेणं त्यांनी सुरू केलंच. शिवाय, अशा मुलांना कसं सांभाळायचं, त्यांना ट्रेनींग काय व कसं द्यायचं, त्यांना कसं शिकवायचं याबद्दल त्यांनी अमेरिकास्थित एक संस्थेतून विशेष शिक्षण घेतलं.

तस्नीमच्या लक्षात आलं की यवतमाळ सारख्या आडवळणाच्या गावात वैद्यकीय सोयी फारशा नाहीत. आणि सगळ्यांनाच नागपूर-पुणे-मुंबई येथे आर्थिक दृष्ट्या जाणे अशक्य आहे. स्वतःच्या मुलीसाठी त्यांनी मुंबई पुण्याच्या केलेल्या वाऱ्या कमी नव्हत्या. तेव्हा अशा special kids साठी यवतमाळ येथे विशेष शाळा सुरू करायचं त्यांनी ठरवलं आणि २०१६ मध्ये छोट्याशा जागेत शाळा सुरु केली. त्यानुसार त्यांनी ‘नवदीन एज्युकेशन सोसायटी’ची स्थापना केली. त्याच नावाने यवतमाळ शहरात शाळा सुरू केली. आज त्यांच्याकडे १५ ते २० विद्यार्थी आहेत. ADHA, LD, Autism, Slow Learner, Cerebral palsy, Dyslexia, multiple disability, Mental retardation, down syndrome, etc. अशा विविध आजाराने ग्रस्त असे ३ ते १६ वयोगटातील दिव्यांग त्यांचे विद्यार्थी आहेत. साधारण मुलांपेक्षा यांना शिकवणं अत्यंत कठीण आहे. दोन अधिक दोन हे शिकायला बरेचदा मुलांना दोन महिने लागतात. पण तस्नीम हिम्मतीने सगळं करत आहेत. मुलांना अक्षर ओळख देणे, काम स्वतःहून करायला शिकवणे, खेळ व त्यातून शिकवण, योगा, व्यायाम असं सगळं तस्लीम मुलांना शिकवतात.
तस्नीम यांना हे सगळं का करावसं वाटलं? असं विचारलं. त्या म्हणतात, “आजार माणसाची आर्थिक परिस्थिती पाहून येत नाही. यवतमाळच्या आजूबाजूला असे काही पालक आहेत जे अशा special child च्या वैद्यकीय आणि शैक्षणिक बाबतीत फार खर्च करू शकत नाही. तेव्हा अशा पालकांच्या पाल्यांसाठी काहीतरी करावं, अस्माची आई म्हणून जे काही सोसलंय ते इतर पालकांच्या वाट्याला येऊ नये, आणि अशा दिव्यांग, मतिमंद मुलांना शिक्षण मिळावं म्हणून शाळा सुरू केली आहे.” मुलांना कसं सांभाळावं, 'अशा' पाल्यांचा सांभाळ करताना स्वतःला कसं तयार करावं, या विषयावर त्या पालकांचं समुपदेशन करतात.
या कामात त्यांचे पती असद त्यांना व्यवसाय सांभाळून मदत करतात. आज नवदीन शाळा असद यांच्याच दुकानातील वरच्या मजल्यावर सुरू आहे.
सर्व सामान्य मुलांना सांभाळताना पालकांच्या नाकी नऊ येतात. मग अशा विशेष मुलांना सांभाळणं, त्यांची काळजी घेणं किती अवघड असेल. तरी हे काम तस्नीम यांनी आव्हान, जबाबदारी म्हणून स्वीकारलं आहे.

तस्नीम असद बॉम्बेवाला
nvdeen education society,
A shool for special kids,
www.navdeen-education.webnode.com
nvdeen.edu@gmail.com
mb 9970 1516 52
nvdeen education society,
A shool for special kids,
www.navdeen-education.webnode.com
nvdeen.edu@gmail.com
mb 9970 1516 52
- निखिल परोपटे, यवतमाळ
ओळख नव्या आमदारांची : श्वेता महाले (भाजप)
चिखलीचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवायचा आहे : आमदार श्वेता महाले
२०१९ च्या निवडणुकीनंतर गठित झालेल्या विधानसभेत २४ महिला आमदार आहेत, मागच्या विधानसभेतल्या महिला आमदारांहून दोन जास्त. यापैकी १२ भाजपच्या आहेत. श्वेता महाले या भाजपच्या विदर्भातल्या एकमेव महिला आमदार. आणि पहिल्यांदा निवडून आलेल्या १२ महिला आमदारांपैकी आहेत. ३६ वर्षाच्या, तरूण आहेत.
त्यांच्या माहेरी (पाटील) आणि सासरी (महाले) दोन्ही कुटुंबांमध्ये सामाजिक – राजकीय काम करणारे नातलग असल्याने श्वेता यांच्यासाठी हे क्षेत्र परिचयाचं होतं. लग्न झाल्यावर संसार आणि मुलाला वाढवण्यात श्वेता यांची सुरूवातीची वर्ष गेली. २०१४ च्या लोकसभा निवडणूक प्रचारांत त्यांनी पंतप्रधान मोदी यांचं भाषण ऎकलं. आणि भारावून जाऊन राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरूवात बुलढाणा जिल्हा परिषदेवर निवडून येण्यापासून झाली.
त्या म्हणाल्या की, महिला-बालकल्याण विभाग कुणाला नको असतो. पण मी त्या विभागाची जबाबदारी आवडीने घेतली. महिला-बालकल्याण सभापती म्हणून त्यांनी जिल्हा परिषद महिला सदस्यांच्या प्रशिक्षणात लक्ष घातलं. प्रशिक्षणासाठी राखीव असलेला नि्धी वापरला. आदर्श अंगणवाड्या असा उपक्रम सुरू करून अंगणवाडी सेविकांना प्रेरित केलं, त्यांच्या कामाची पावती दिली. गावातल्या आणि तालुक्यातल्या निवडून आलेल्या स्त्रियांच्या हाती पहिल्यांदा माईक मिळाल्यावर त्यांना कसा आत्मविश्वास वाटतो, हे अनुभवणं खूप छान वाटल्याचं श्वेता म्हणाल्या.
आता आमदार झाल्यावर महिलांच्या समस्यांना प्राधान्य देणं सुरूच राहाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. महिलांच्या, गावांच्या विकासाशी जोडलेला मूळ विषय पिण्याचं पाणी हा आहे. चिखली मतदारसंघातल्या सर्वच्या सर्व १४६ गावांना आणि चिखलीतल्या गरीब श्रीमंत सर्व कुटुंबांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावतो आहे. तो सोडवायचा, हे माझ्या यादीतलं पहिलं काम आहे, असं श्वेता महाले यांनी सांगितलं.

गांधीजींचं मोठेपण उलगडणार्या छोट्या गोष्टी : २ (वाचक : माधवी कुलकर्णी)
व्हिडीओ लिंक : https://www.facebook.com/watch/?v=740725789733356
Subscribe to:
Posts (Atom)