Sunday, 21 August 2016

नवी उमेद

लोकसमस्यांच्या सोडवणुकीच्या सामूहिक आणि व्यक्तिगत प्रयत्नांना सर्वदूर पोचवण्यासाठी...

आपल्या अवतीभोवती घडणा-या काही चांगल्या घटना शेअर करण्याची ही जागा आहे. 

तुमच्या लक्षात आलंय का ?...की आपण हल्ली फार नकारात्मक बोलत असतो. व्यवस्थेविषयी तक्रारी करत राहातो. 
कुणाला ना कुणाला नावं ठेवत बसतो. 

ज्या गोष्टी चुकीच्या वाटतात, नियम- कायदे जिथे धाब्यावर बसवले जातात, समस्यांचं निवारण केलं जात नाही- तिथे बोललं पाहिजेच. पण जिथे काही चांगलं घडतंय, लोक काही नवं घडवतायत, एनजीओ समस्यानिवारणात पुढाकार घेतायत, सरकारी व्यवस्था नोंद घेण्याजोगं काम करतेय, आपले लोकप्रतिनिधी आपल्याला मदत करतायत - हेही सगळं बोलत राहिलं पाहिजे, याचंही कौतुक केलं पाहिजे. 

हा ब्लॉग त्यासाठीच. इथला मजकूर वाचून नवी उमेद जागेल, वाढेल. उमेद असली की पुन्हा चांगलं काही घडवायला, शेअर करायला हुरूप येईल. 
संपर्क या लोकसमस्यांचा आणि समस्यासोडवणुकीचा पाठपुरावा करणा-यांच्या नेटवर्ककडून हा ब्लॉग आणि याच नावाचं फेसबुक पेजही चालवलं जात आहे. 

इथला मजकूर शेअर करून इतरांचीही उमेद वाढवा. तसंच उमेद वाढवणारा मजकूर पाठवून आपण योगदानही करू शकता.

संपर्क: naviumed@sampark.net.in