Saturday 7 September 2019

रत्नागिरीतून सांगली, कोल्हापूरला तब्बल पाच हजार सँनेटरी नँपकीन रवाना

सांगली, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना राज्यभरातून मदतकार्य सुरू आहे. रत्नागिरीकरही आपापल्या परीनं त्यात योगदान देत आहेत. पूरग्रस्तांसाठी धान्य,खाऊ कपडे,पाणी मोठ्या प्रमाणावर जमा झालं. घरदार वाहून गेलेलं. मेडिकलसह एकही दुकान शिल्लक नाही अशी इथली स्थिती. तेव्हा इतर साहित्याबरोबरच सँनेटरी नँपकीन्सचीही मोठी गरज असल्याचं लक्षात आलं. यासाठी वेगवेगळ्या संस्था पुढे आल्या. ग्राहक संघ, राष्ट्र सेवा समिती, गोगटे जोगळेकर महाविद्यालयातले बीकाँँम आणि बीएमएसचे विद्यार्थी पुढे सरसावले. 
       आनंदी सोशल फाऊंडेशन आणि आनंदी वुमन्स केअरनं नॅपकिन्स तयार करण्यासाठी पुढाकार घेतला. रविवारी पाच हजार सॅनिटरी नॅपकिन्स सांगली, कोल्हापूरकडे रवाना करण्यात आली. यासाठी संस्थेनं तीन दिवस, रात्रंदिवस काम केल्याचं संचालिका पल्लवी पटवर्धन यांनी सांगितलं. यासाठी विद्यार्थ्यांनी मोठा पुढाकार घेतल्याचं पटवर्धन यांनी आवर्जून सांगितलं. 
-जान्हवी पाटील

No comments:

Post a Comment