Saturday, 7 September 2019

स्वातंत्र्यदिनी असं काही घडावं.

स्वातंत्र्यदिनी असं काही घडावं. तुळजापूर इथल्या आमदार संवाद मंचाच्या सुजाण सदस्यांनी हे घडवून आणलं. तुळजापूर तालुका पंचायत समितीने आज झेंडावंदनासोबत एक नेक कृती केली. त्यांनी बालविवाहविरोधी शपथ घेतली. यावेळी सभापती शिवाजी गायकवाड, गटविकास अधिकारी राऊत आणि आमदार संवाद मंच, तुळजापूर इथले सर्व सदस्य उपस्थित होते. 
बालविवाह अजूनही होतात अशा भारतातल्या ७० शहरांत महाराष्ट्रातली १७ आहेत. तुळजापूर हे त्यातलं एक. मुलगे वा मुली, कोणाचाच विवाह बालवयात करायला नको. प्रत्येकाचं शिक्षण पुरं होणं आणि सर्वांनी आपल्या पायावर उभं राहाणं हे आधी महत्वाचं. नंतर लग्नाचा निर्णय घेणं हे योग्य. तसा कायदाही आहे. तरी, गरिबी, मुलीचं ओझं वाटणं, पालकांना स्थलांतर करावं लागणं, परंपरेचा प्रभाव अशा विविध कारणांनी बालविवाहाची रूढी अजून सुरू आहे. बालविवाहाची कारणं दूर करणं आणि त्याबद्दलची जागरूकता वाढवणं यासाठी आपल्या स्वातंत्र्यदिनासारखा मुहूर्त योग्यच नाही का? #नवीउमेद
- अनिल आगलावे
संपर्क / नवी उमेद प्रतिनिधी, तुळजापूर, जि उस्मानाबाद

No comments:

Post a Comment