शिक्षण फक्त नववी, घरची सहा एकर शेती. त्यातही काही वर्षांपासून सततची नापिकी, बदलतं हवामान. उत्पादन कमी आणि खर्च जास्त. एकीकडे मुलांचं शिक्षण आणि घरखर्च. या सगळ्या फेऱ्यात चिखली तालुक्यातला सवणा इथला शरद हाडे हा तरुणही अडकलेला. त्याने शेतीला जोड म्हणून दूधव्यवसाय निवडला आणि नापिकीच्या फेर्यातून त्याची सुटका झाली.

उरलेल्या दुधापासून दही, पनीर, तूप, ताक बनवणंही चालू केलं. आता त्यातून शरदला दररोज १० ते १२ हजार रुपये मिळतात. शेती कमी असल्याने म्हशींना चारा, ढेप, कुटार, हे सर्व विकत आणावं लागतं. चारापाणी, मजूर हा खर्च होऊनही शरद आता दररोज निव्वळ नफा म्हणून ७ ते ८ हजार रुपये कमावतोय.
म्हशींच्या व्यवसायापासून शरदला वर्षाला ४० ते ५० ट्रॉली शेणखत आणि मलमूत्रही मिळतं. स्वतःच्या शेतात काही शेणखत टाकून उर्वरित शेणखत आणि मलमूत्र तो २००० हजार रुपये ट्रॉलीप्रमाणे इतर शेतकऱ्यांना विकतो. त्यातूनही आता उत्पन्न मिळू लागलं आहे. आता तीन मजुरांना त्याने रोजगार मिळवून दिला आहे. पहिल्याच वर्षी शरदने म्हशी विकत घेण्यासाठी उसने घेतलेले पैसे फेडून टाकले. अल्पशिक्षित असूनही मेहनत आणि हुशारीने शरदने दुग्धव्यवसाय वाढवला आहे.
- अमोल सराफ.
No comments:
Post a Comment