Tuesday 10 July 2018

मातामृत्यू दर कमी करण्यात देशात केरळपाठोपाठ महाराष्ट्राचा क्रमांक. राज्याचा दिल्लीत गौरव.



मातामृत्यू दर कमी करण्यात देशात केरळपाठोपाठ महाराष्ट्रानं दुसरा क्रमांक पटकावला आहे. राज्यात मातामृत्यूचं प्रमाण ६८ वरून ६१ वर आलं आहे. गेल्या तीन वर्षात हे प्रमाण १०. ६ टक्क्यानं कमी झालं आहे. राज्यातील आरोग्ययंत्रणेच्या याच कामगिरीचा गौरव केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं केला आहे. केरळमध्ये हजार गर्भावती स्त्रियांमागे ४६ मातांचा मृत्यू होतो तर महाराष्ट्रात हे प्रमाण ६१वर आहे. हेच प्रमाण देशात १०३ आहे. मातामृत्यूचं प्रमाण लक्षणीय कमी केल्यामुळे युनिसेफनेसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थेनं महाराष्ट्राची दखल घेतली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं भारताला वर्ष 2030 पर्यंत प्रत्येकी 1000 गर्भवती महिलांमागे 70 पर्यंत मृत्यूदर कमी करण्याचं लक्ष्य दिलं आहे.
या कामगिरीबाबत महाराष्ट्राचा नवी दिल्लीत केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी नड्डा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. राज्य सरकार गर्भावती महिलांना उत्तम सुविधा देण्याचा प्रयत्न करत असून या सुविधा सक्षम करण्यावर भर असल्याचं आरोग्यमंत्री डॉ दीपक सावंत यांनी दिल्लीतल्या सत्कार सोहळ्यात सांगितलं. 

-प्रशांत परदेशी 

No comments:

Post a Comment