Sunday 20 August 2017

विदर्भातील पारंपारिक खांदेमळण, आवतणची जुनी परंपरा

पोळा विशेष
उद्या पोळा. शेतकऱ्यांचा महत्त्वाचा सण. शेतकऱ्याचा सहकारी असलेल्या बैलजोडीला यादिवशी विशेष मान दिला जातो.



आजचं या सणाची खरी लगबग सुरु होते. आधी बैलाला आमंत्रण दिलं जातं. नदीवर स्वच्छ धुवून, त्याच्या खांद्याला पळसाच्या पानांनी लोणी-हळदीचं मालिश होते. या खांदेमळणानंतर बैलाला पोळ्यापर्यंत विश्रांती दिली जाते. पोळ्याच्या दिवशी पुरणपोळी व ज्वारीच्या ठोंबराच्या जेवणाचं आमंत्रण बैलाच्या कानात दिलं जातं. हेच बैलाचं पारंपारिक मानाचं आवतन. बैलाला तेलाने मालीश करून वर्षभर झालेल्या इजा दूर केल्या जातात. शिंगाची रंगरंगोटी केली जाते. 
- अमोल सराफ.

No comments:

Post a Comment