Friday 25 August 2017

खामगावचा लाकडी गणेश

एकाच खोडामध्ये तयार केलेली ही अडीच ते तीन क्विंटलची गणेशमूर्ती भाविकांचे आराध्य दैवत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात खामगाव ही कापसाची मोठी बाजारपेठ होती. त्यामुळे खामगावात मोठमोठय़ा कंपनीच्या जिनिंग-प्रेसिंग होत्या. या जिनिंग-प्रेसिंगवर काम करणाऱ्या अधिकार्‍यांचे जेवण बनवण्यासाठी दक्षिणेतील अय्या (आचारी) ठेवण्यात आले होते. हे अय्या राहायचे तो भाग म्हणजे 'अय्याची कोठी' म्हणून पुढे ओळखला जाऊ लागला. 



त्याकाळी या अय्या लोकांनी एकाच खोडावर कोरीव काम करून अखंड लाकडी गणेशाची स्थापना एका ओट्यावर केली होती. कालातरांने १९९५ मध्ये या मंदिराची रजिस्टर संस्था स्थापन झाली. आणि विश्‍वस्त मंडळाने मंदिर बांधून घेतले. शहरातून निघणार्‍या श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत अग्रभागी राहण्याचा मान या गणपतीला असतो. मिरवणुकीनंतर या गणेशाची मंदिरात पुन्हा स्थापना केली जाते. सध्या या मंदिराचा कार्यभार अध्यक्ष म्हणून अँड.आर.बी.अग्रवाल पाहत आहेत. 

No comments:

Post a Comment