पिंपळा, टाकळशिंग, वाहिरा, सय्यदमीर लोणी हा नगररोडचा डावा भाग. कमी पावसाचा. नियोजन करून पाणीसाठा कसा वाढेल ते पाहिलं. आणि ऑगस्टमध्ये सर्वच्या सर्व १६५ टँकर बंद झाले. जलयुक्त शिवारच्या कामांमुळे पाणीसाठा वाढला. मुख्य म्हणजे बेसुमार पाणीउपसा आणि पाणीचोरी हे थांबलं. ग्रामस्थ आणि यंत्रणेतील अधिकाऱ्यांच्या सहकार्याने हे यश आल्याचं तहसीलदार गोरे सांगतात.
याआधी रामेश्वर गोरे वाशी तहसील कार्यालयात नियुक्त होते. तिथे तहसील आणि पंचायत समितीचं कार्यालय एकाच इमारतीत. दोन्ही कार्यालयांना अवकळा आलेली. शिस्त नावालाच. अनागोंदी कारभार. गोरेंनी प्रथम कर्मचार्यांना विश्वासात घेतलं. काम करण्यासाठी उमेद, पाठबळ दिलं. कार्यालयाची कामाची गती वाढू लागली. सहा महिन्यांपासून रखडलेलं, दिडशे निराधारांचं शासनाकडून मिळणारं मानधन गोरे यांनी निराधारांच्या खात्यावर जमा केलं. हळूहळू अन्य कामांचा उरकही वाढला. आणि २०१५ मध्ये वाशी तहसील कार्यालयाला महसूल दिनी आदर्श तहसीलदार पुरस्कार मिळाला. विशेष म्हणजे गोरे यांनी बीडला नायब तहसीलदार या पदावर असतानाही हा पुरस्कार मिळवला होता.
कोण म्हणतं शासकीय यंत्रणा काम करत नाही?
रामेश्वर गोरे यांनी शिस्त आणि नियमांचं पालन करत कामांना वेग दिलाच. पण लोकांना विश्वासात घेऊन, कर्मचार्यांवर विश्वास टाकून पाणीबचतीचं मूल्यही लोकांत रुजवलं. यामुळे दुष्काळी स्थितीतही पाण्याची बचत करता येते, हे सिद्ध झालं. शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील जनतेपर्यंत पोचतो, हा विश्वास आष्टीचे (जि. बीड) तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी आपल्याला दिला आहे.

- मुकुंद कुलकर्णी.
No comments:
Post a Comment