Tuesday 14 November 2017

जिंदगी से संतुष्ट हूं : शम्स जालनवी


पहाटे 5 ची वेळ. एक म्हातारबाबा सायकलवरून पेपर वाटताना दिसतो. जवळ जाऊन बोलल्यावर कळतं की हे आहेत, महंमद शमशोद्दीन उर्फ शम्स जालनवी. जालन्याच्या सांस्कृतिक क्षेत्रातील मोठं प्रस्थ... शायरी, मुशायऱ्यामधून प्रेक्षकांच्या गळ्यातले ताईत.
सध्या वय 91. गेल्या 40 वर्षांपासून ते पेपरवाटपाचं काम करत आहेत. 1926 साली त्यांचा जालन्यात जन्म झाला. शमशोद्दीन यांना वयाच्या 14 व्या वर्षांपासून गझल, शायरीचे वेध लागले. त्याकाळी शायरी गझलाच्या खूप मैफिली व्हायच्या, शायरी गझलांना चांगले दिवस होते. त्या वातावरणात शमशोद्दीन मोठे झाले. घरप्रपंचाचा गाडा चालवण्यासाठी फिटरकीचं काम करू लागले. यंत्रांच्या संगतीतही त्यांचं शायरी, गझलांचं प्रेम कमी नाही झालं. तिथूनच शमशोद्दीन यांचा ‘शम्स जालनवी’ या नावाने प्रवास सुरु झाला. आजही त्यांना विविध ठिकाणांहून बोलावणं येतं, त्यांच्या कार्यक्रमाला चाहते आवर्जून उपस्थित राहतात. भारतभर त्यांनी शायरी मुशायऱ्यांना हजेरी लावली. ते म्हणतात, “हैद्राबाद म्हणजे तर घर-अंगण. तिथे मैफिलीत वाहवा मिळवण्याची मजा काही औरच !”



1986 साली फिटरकीच्या व्यवसायातून ते दूर झाले. तेव्हाच त्यांनी पेपरवाटपाचं काम सुरु केले ते आजतागायत. शम्स यांना 3 मुलं, 3 मुली. या वयातही पेपरवाटपाचं काम का क

रता असं विचारल्यावर ते म्हणाले, "दिल की तसल्ली के लिये करता हूं। सरकार से हजार रुपये महिना मिलता है, अपना खुदका गुजारा हो जाता है। दोनों बेटे इलेक्ट्रिशियन हैं। लेकिन मैं खुद भी मेहनत करना चाहता हूं । किसीका लेना नही, किसीका देना नही। दोपहर तक पेपर बाटता हूं। उसके बाद आराम करता, पढते रहेता। आज भी नई नई गझले बनाता हु, जिंदगीसे संतुष्ट हूं । इस दुनिया में अच्छेबुरे सब मिलते, वादे करनेवाले भी और वादे तोडनेवाले भी। इसलीये मै हॅंसकर टाल देता हूं ।" 


- अनंत साळी


No comments:

Post a Comment