गडचिरोलीतल्या सामाजिक उपक्रमात लोकसहभाग मोठा होता. हे उपक्रम राबवताना खूप समाधान लाभलं, रत्नागिरीतही असे काही उपक्रम राबवणार असल्याचं इंगळे सांगतात. वर्षभरापूर्वी त्यांनी रत्नागिरी उपविभागीय पोलीस अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारला. इंगळे मुळचे अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यातल्या पानवली गावचे. आईवडिलांचं लहानपणीच देहावसान. शिक्षण मुंबईत घाटकोपरला मावशीकडे. मावशी, मामा, नातेवाईकांच्या सहकार्यानं डीएडपर्यंतचं शिक्षण. स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या जिद्दीतून नाशिकमधल्या रायता गावात वर्षभर शिक्षक. रोजची १२ किमीची पायपीट. मग एमपीएससी आणि 2013 मध्ये डिवायएसपी म्हणून निवड. शांत, मनमिळावू स्वभाव, तपासकामातली चतुराई, धाडसी वृत्ती, समस्या मार्गी लावण्याचा हातखंडा यामुळे अल्पावधीतच इंगळे यांनी पोलीस खात्यात आदर्श अधिकारी म्हणून नाव कमावलं आहे. परिस्थिती कशीही असली तरी आपण ध्येय सोडता कामा नये , असं ते सांगतात.
-जान्हवी पाटील.

No comments:
Post a Comment