Sunday 18 June 2017

इवल्याशा हातातून उतरली वारली चित्रे



 "आई, सकाळी लवकर उठव हं", 10 वर्षाच्या मुलाने मला बजावले. "आई , मी पण येणार भिंत रंगवायला", 4 वर्षाच्या चिमुरड्याचा उत्साह उतू जात होता. यावर्षीच्या उन्हाळी सुट्टीत 'गुणप्रज्ञा' (गोरेगांव, मुंबई) सोसायटीच्या भिंतीवर 'स्वरगंध कलामंच' च्या सदस्यांनी वारली पेटिंग केले. स्वरगंध कलामंचाच्या प्रकाश देसाई, शशांक कामत, समता महाजन, पंडित गिरीश छत्रे आणि गौरी परूळेकर यांची ही कल्पना. 
यासाठी अगदी तीन ते १५ वयोगटातील मुलांनी हजेरी लावली. सतत तीन दिवस, तीन तासात मुलांनी ५०० स्क्वेअर फुटांची भिंत रंगवली.
वारली चित्रकला शिकायला मिळाली म्हणून भार्गव आणि किमया खुश होते. तर, सुदीक्षानं सांगितलं की, आम्हाला अशी संधी पहिल्यांदाच मिळाली. भिंत रंगवणे हे एक कठीण काम आहे असं वाटत होतं. पण नंतर पेंट ब्रश कधीच खाली न ठेवता रंगकाम करत राहावं असं वाटू लागलं.
 '' 'परिसर स्वच्छ ठेवा', 'कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावा', 'पाण्याचे नियोजन करा व पाणी वाचवा', 'झाडे लावा', 'पर्यावरणाचे संगोपन करा' हे संदेश सुबकतेने पोहोचवण्यासाठी वारली चित्रकला प्रभावी वाटली आणि आम्ही ती एन्जॉय केली" कॉलेजला जाणारी राधा बारिक स्ट्रोक्स् देताना सांगत होती.
संपर्क : प्रकाश देसाई - अध्यक्ष – 9967598961 / समता महाजन - प्रमुख कार्यवाह - 9819720037

No comments:

Post a Comment