Sunday 4 June 2017

केरळ सरकारचं अभिनंदन. आणि महाराष्ट्र सरकारला विनंती


राज्यातल्या सर्व शाळांमध्ये सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग आणि पर्यावरणस्नेही डिस्पोजल मशीन्स बसवणं अनिवार्य करणारं केरळ हे भारतातलं पहिलं राज्य ठरलं आहे. सरकारी शाळांसह खाजगी, अनुदानित वगैरे सर्वच शाळांसाठी हा निर्णय बंधनकारक केला आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर शाळा उघडण्याच्या तोंडावर केरळच्या मुख्यमंत्र्यांनी मुलींच्या जिव्हाळ्याच्या विषयावर हा महत्वाचा निर्णय घेतलाय. ३० कोटी रु खर्चाची ही She Pad नावाची योजना आहे. राज्याच्या महिला विकास महामंडळातर्फे सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मदतीने ही योजना अंमलात येत आहे. शाळेतल्या मुलींच्या संख्येच्या प्रमाणात पॅड्स आणि मशीन्सची संख्या ठरवली जाईल.
लवकरच जागतिक मासिक पाळी आरोग्य दिन आहे. मासिक पाळीकाळात स्वच्छता, आरोग्याची काळजी घेण्याचा प्रत्येक स्त्रीचा, मुलीचा अधिकार आहे. तो बजावण्यासाठी शासन, समाज आणि कुटुंब - सर्वांनीच मदत केली पाहिजे.
केरळप्रमाणेच महाराष्ट्रातही कृपया हे घडवून आणा माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र ! हा विषय नवी उमेद Navi Umed ने गेलं वर्षभर लावून धरलाय. अनेक आमदारांशी यावर आम्ही चर्चादेखील केली आहे. विधिमंडळात दाखल करण्यासाठी या विषयावर प्रश्नदेखील पुरवले आहेत. वर्सोव्याच्या आमदार Dr. Bharati Lavekar यांनी त्यांच्या मतदारसंघात ही मशीन्स बसवण्याचा निर्णय घेऊन योजनेचा आरंभही नुकताच केला. संपूर्ण राज्यभर, सर्व शाळा-कॉलेजात मुलींना सॅनिटरी नॅपकिन्स सहज उपलब्ध झाले पाहिजेत. वापरलेल्या नॅपकिन्सची विल्हेवाटही सहज करता आली पाहिजे.
सर्व लोकप्रतिनिधींना कळकळीची विनंती की यात लक्ष घालाचं आणि लवकर निर्णय घ्यावा. #तेपाचदिवसतिलापरतमिळवूनदेऊया
ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा. आणि शेअर करताना आपापल्या विभागातल्या आमदारांना कृपया tag करा.

No comments:

Post a Comment