Monday 1 October 2018

निरागसता हा एक शब्दच बालपणाचं वर्णन करण्यास पुरेसा आहे.

बापपणातल नेमके सुख काय असते हे कुठल्याही शब्दात नेमकेपणाने पकडता येत नाही. आणि प्रयत्न केला तर एखादा प्रबंध ही कमी पडेल असं सुख बापपणात असतं
निरागसता हा एक शब्दच बालपणाचं वर्णन करण्यास पुरेसा आहे.
माझ्या एकुलत्या एक मुलीचं बालपण साजरं करतांना मी ही निरागसता पुरेपूर आनंदाने अनुभवली आहे
अपरात्री न थांबता रडणाऱ्या बाळाला शांत करुन झोपवणं हे जगातील सर्वांत आव्हानात्मक काम आहे याचा यशस्वी अनुभव घेतला आहे
रंग, गंध,स्पर्श, चव ,आवाज या सगळ्यांंचे अनुभव तिला देताना मीही हरवून गेलो आहे.
खरंतर बाप होणं म्हणजे आपल्या 'मुल'पणाच्या पुनर्प्रत्ययाचा अनुभव देणारी संधी आहे आणि या संधीच मी सोनं केलं याचा मला सार्थ अभिमान आहे .....
- डॉ. श्रीकांत कामतकर

No comments:

Post a Comment