
दक्षिण आफ्रिकेतली 'कॉम्रेड्स मॅरेथॉन' जगातील सर्वाधिक जुन्या स्पर्धांपैकी एक. तिच्या वेगळेपणामुळे जगात प्रसिद्ध. ही स्पर्धा नेहमीसारखी रस्त्यावरुन किंवा सपाट भूभागावरुन धावण्याची नाही. ही आहे हिल मॅरेथॉन. म्हणजेच उंच पसरलेल्या डोंगररांगावर असलेल्या उंचसखल रस्त्यावरुन धावणे. यामुळेच जगभरातल्या स्पर्धकांसाठी ती आव्हानात्मक ठरते.

काही समविचारी व्यक्तींच्या साथीनं काटे यांनी सातारा हिल हाफ मॅरेथॉन कमिटी स्थापन करुन स्पर्धेची जय्यत तयारी केली. ७ ऑक्टोबर २०१२ ला पोलीस कवायत मैदान ते यवतेश्वर घाटातून प्रकृती रिझॉर्टपर्यंत हाफ मॅरेथॉनचा ट्रॅक करण्यात आला. या स्पर्धेमध्ये पहिल्या वर्षी विदेशी-देशी व स्थानिक अशा ३ ते ४ हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला. देशातली ही पहिली हिल मॅरेथॉन ठरली. हळूहळू स्पर्धेची महती पसरू लागली . दरवर्षी हजारो लोक या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ लागले. डोंगरावर धावण्याच्या स्पर्धेत ( सिंगल माउंटन ) सर्वाधिक लोक सहभागी होण्याचा विक्रम या स्पर्धेच्या नावावर आहे. त्याची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. अशा प्रकारची जगातील ही दुसरी मॅरेथॉन असून आज जगभरात तिचा लौकिक पसरला आहे. सातारा हिल हाफ मॅरेथॉन कमिटी दरवर्षी विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत असते. त्यापैकी एक म्हणजे मातीतील खेळ. हल्ली मोबाईल-टीव्हीच्या जमान्यात लहान मुलं मातीतील खेळ विसरली आहेत. हे ओळखून सातारा हिल हाफ मॅरेथॉन असोसिएशन मातीतील खेळांचा उपक्रम दरवर्षी शाहू स्टेडियममध्ये आयोजते.
याखेरीज इतरही काही स्पर्धां भरतात. त्यांच्या आयोजनात महिलांचा पुढाकार आहे. राजवी हेळगेकर यांची एल.ओ. एस.ओ. एम., तसंच चंद्रलेखा घाडगे यांची आयकॉनिक ऑरा वूमेन्स रन या मॅरेथॉन स्पर्धाही काही वर्षांपासून सातार्यात चांगलंच बाळसं धरू लागल्या आहेत. महिलावर्गातून यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
सातार्यावर निसर्गानं मुक्तहस्ते उधळण केली आहे. दरवर्षी लाखो पर्यटक कास- यवतेश्वर, बामणोली या ठिकाणी भेट देतात. सातारा हिल हाफ मॅरेथॉनच्या निमित्तानं पर्यटनही होतं . त्यामुळे स्थानिकांनाही मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण झाला आहे. यामुळे आता मॅरेथॉनचं गाव अशी नवी ओळख साताऱ्याला मिळाली आहे.
- संग्राम निकाळजे.
No comments:
Post a Comment