Sunday 8 December 2019

ll त्या झाडाला तोडू नका ll

जे झाड होते सावली 
त्या झाडाला तोडू नका l
जे झाड फुलांची परडी 
त्या झाडाला तोडू नका l
जे झाड फळांची पेटी
त्या झाडाला तोडू नका l
जे झाड घर पक्ष्यांचे 
त्या झाडाला तोडू नका l
दे झाड मित्र सगळ्यांचे
त्या झाडाला तोडू नका l
ll त्या झाडाला तोडू नका ll
अनंतराव भावे यांना बालसाहित्यासाठी साहित्य अकादमीने पुरस्कृत केलंय. त्यांनी सांगितलं की ही कविता मुलांना फार आवडते. सोशल मिडियामार्फत ही कविता अधिकाधिक मुलांपर्यंत पोचवावी, असं त्यांनी आग्रहाने सुचवलंय.

No comments:

Post a Comment