Tuesday 5 March 2019

दोन लाख ४० हजार चौरस फुटांवर रेखाटली रांगोळी...


लातूर जिल्ह्यातल्या निलंगा इथल्या दापका रस्त्यावरचं एन डी नाईक यांचं शेत. शिवजयंतीनिमित्त अक्का फाऊंडेशननं शेतात अंकुरलेली ही महाराजांची प्रतिमा.
दोन लाख ४० हजार चौरस फुटातली ही प्रतिमा मंगेश निपाणीकर यांनी साकारली आहे. प्रतिमेसाठी आधी जमीन समतल केली. तिची चांगली मशागत केली. त्यानंतर निपाणीकर आणि त्यांच्या सहायकांनी रांगोळीने शिवप्रतिमा रेखाटली. त्यावर दीड हजार किलो अळीव बीज पेरलं. अवघ्या पाच दिवसात शिवछत्रपतींची प्रतिमा साकारली. प्रतिमा अधिक उठावदार व्हावी यासाठी ५० हजार किलो रांगोळीने आरेखन केलं आहे. संकल्पना अरविंद पाटील निलंगेकर यांची.
-प्राजक्ता जाधव

No comments:

Post a Comment