Wednesday 5 June 2019

बातम्या तुमच्या - आमच्या मुलांच्या

अब नही तो कब?
आता, सर्वांचं लक्ष आहे लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे. त्या आधी थोडं मागे वळून निवडणूकप्रचाराकडे पाहिलं तर काय दिसतं? समान्य लोकांच्या खर्‍याखुर्‍या प्रश्नांची चर्चा या प्रचारात झाली का? तसं दिसलं नाही. आणि जे प्रत्यक्ष मतदार नाहीत त्यांचा विचार मागेच पडल्याचं जाणवलं. 
१८ वर्षाखालील मुलं मतदान करू शकत नाहीत. पण त्यांचे प्रश्न अनेक आहेत. शिक्षण, आरोग्य, सुरक्षितता हे त्यांचे महत्त्वाचे प्रश्न. ते निवडणुकीच्या चर्चेत आणण्याचे अगदी मोजकेच प्रयत्न झाल्याचं दिसलं. 
आमच्या संपर्क संस्थने युनिसेफच्या सहकार्याने 'बालकांची सनद' असं एक मुलांचं मागणीपत्र तयार केलं. आणि ते महाराष्ट्रातील पक्षनेते, खासदार, आमदार यांना भेटून, चर्चा करून दिलं. 
'अब नहीं तो कब?'... हे अभियान लर्निंग कम्युनिटीने केलं. त्यांनीही मुलांचा जाहीरनामा तयार केला. मागील पाच वर्षांमध्ये किशोरवयीन मुलींना शहरामध्ये वावरताना आलेले अनुभव, त्यांच्या आशा-आकांक्षांचं प्रतिबिंब या मागण्यांमध्ये आलं आहे. मुंबईतल्या ३५ वस्त्यांमधल्या १,१४० किशोरवयीन मुलींशी बोलून हे मागणीपत्र सादर करण्यात आलं आहे. काय मागितलं आहे आपल्या मुलींनी? वैयक्तिक तसंच सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या हिंसेला विरोध करण्यासाठी त्यांना सक्षम व्हायचं आहे. स्वच्छ आणि सुंदर शहरांसोबत मुलींना सुरक्षित शहरही हवं आहे.
घेतली जाईल का या मागण्यांची नोंद नव्या सरकारकडून?
 - लता परब

No comments:

Post a Comment