Wednesday 5 June 2019

उमेदने नवी वाट दाखवली... वाचक अभिप्राय...

माझी आणि नवी उमेदची पहिली सोशल मिडियावरील भेट ही चेतना चौधरीमुळे झाली. आमच्या श्री संस्कार अनाथ मतिमंद मुलींच्या बालगृहातील सुनीताच्या विवाहाबद्दल आणि एका मुलीचे पालक शोधण्यात ज्यांचा सिंहाचा वाटा होता त्या चेतनाताईंनी नवी उमेदची ओळख करून दिली आणि आम्हांला एक नवीन वाट दाखवली. 
नवी उमेदवरील लेख, गोष्टी, मालिका, पोस्ट यात जे सांगितलेलं असतं, ते आपल्या जीवनात कसं आचरणात आणता येईल हे ठरवलं तरच वाचक म्हणून आपलं यश म्हणता येईल.
आजचा माणूस संभ्रमात पडलेला असतो त्यातून बाहेर पडण्यासाठी नवी उमेदचं मार्गदर्शन नक्कीच घ्यायला हवं, हे मी सर्व वाचकांना नम्रपणे सांगू इच्छितो.
नवी उमेद पेज चाळतांना जगण्याला स्पर्श करणारे अनुभव मिळतात. आणि यातून लोकांच्या प्रयत्नांना प्रेरणा मिळत आहे.
सर्वांना एकत्रित आणून, तुम्ही जो उपक्रम राबवत आहात तो नक्कीच खूप पुढे गेला आहे आणि त्यापेक्षाही वर जाईल यात शंकाच नाही.
- निखिल वाघ, धुळे

No comments:

Post a Comment