Wednesday 5 June 2019

सकारात्मक विचार निर्माण करण्याच्या उपक्रमात वृध्दी होवो... वाचक अभिप्राय

मी ‘नवी उमेद’चा नियमित वाचक आहे. सध्या मी नोकरीनिमित्त वापी (गुजरात) येथे असून नवी उमेदवर महाराष्ट्रातील विविध भागांतून येणाऱ्या पोस्ट‌्स नियमित वाचतो. या पोस्टस समाजातील वेगळेपणा मांडणाऱ्या असतात. त्या वाचून प्रेरणा मिळते. जे लोक समाजात सकारात्मक काम करतात, त्यांना अशा प्रकारे जगासमोर आणणे कौतुकास्पद आहे. आमच्या गावातील माऊली बाबा कदम यांनी लावलेल्या झाडांची पोस्ट नवी उमेदवर वाचली. वाचून छान वाटले. यातून नक्कीच अनेकांना निसर्ग व वृक्ष संवर्धनाची प्रेरणा मिळालेली असेल. याशिवाय दुष्काळाच्या कथा वाचल्या. विदर्भातील पाणीप्रश्नाच्या छटा दिसल्या. शिवाय कडा येथील पशुपक्ष्यांसाठी अन्नपाण्याची व्यवस्था ही पोस्टही छान होती. नवी उमेदच्या सर्व सहकाऱ्यांना तिसऱ्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा, समाजात सकारात्मक विचार निर्माण करण्याच्या उपक्रमात वृध्दी होवो, ही सदिच्छा..

- जयप्रकाश सातपुते, बीड.

No comments:

Post a Comment