Wednesday 5 June 2019

माझ्यासह असंख्य युवकांचे प्रेरणास्त्रोत: नवी उमेद, (वाचक अभिप्राय)

आज माझ्यासह असंख्य युवकांचे प्रेरणास्त्रोत म्हणून नवी उमेद कार्य करत आहे. सुरुवातीला नवी उमेद विषयी मी फेसबुकवर वाचले. पेजवरच्या एका प्रेरणादायी पोस्टने मी खूप भारावलो आणि त्यानंतर नवी उमेद विषयी गुगल करण्याचा प्रयत्न केला. नवी उमेद विषयी बरीचशी माहिती मिळवली आणि पेजवरील सलग पन्नास लेख मी वाचले. या फेसबुक पेजवर कोणतीही नकारात्मक बातमी, नकारात्मक स्टोरी आपणास दिसणार नाही. किंबहुना या पेजचे तसे ठरलेले आहे की नकारात्मक बाबी मांडायच्या नाहीत. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती समाजातील वंचित घटकांसाठी कोणत्या प्रकारे कार्य करत आहे त्यास नवी उमेद द्वारे प्रसिद्धी देणे जेणेकरून समाजातील इतर व्यक्ती प्रेरणा घेतील. म्हणूनच, या पेजवर राज्यातील असंख्य अशा स्टोरी वाचण्यास मिळाल्या, ज्या कधीच लोकांसमोर आल्या नसत्या. सोशल मीडियावरील चांगल्या स्टोरी, प्रेरणादायक बाबी वाचण्यासाठी हे एक चांगलं व्यासपीठ आहे. तसेच अजून एक उल्लेखनीय बाब म्हणजे ज्या व्यक्तींचे काम किंवा सामाजिक कार्य ही फक्त त्यांच्या गावापुरतं किंवा त्यांच्यापुरतं मर्यादित असतं त्या कामांना नवी उमेद द्वारे व्यापक स्वरूप दिलं जातं यापेक्षा मोठी भेट सामाजिक कार्य करणाऱ्या त्या व्यक्तीसाठी असू शकत नाही. म्हणून उद्याही नवी उमेद माझ्यासारख्या असंख्य युवकांसाठी नक्कीच प्रेरणा स्त्रोत म्हणून उभे राहील अशा भविष्यासाठी शुभेच्छा.
- दिग्विजय सिंग राजपूत, नंदुरबार

No comments:

Post a Comment