Sunday 18 August 2019

मुलं शाळेत चवीचं खाणार; कारण परसबाग देणार.



हे बाणगे विद्यामंदिर या शाळेतलं दृष्य. तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर.
जिल्हा परिषद कोल्हापूर, शिक्षण विभाग आणि रिलायन्स फाऊंडेशन यांनी एकत्र येऊन एक छान काम सुरू केलं आहे. शाळेत जाऊन पोषण आहाराचं महत्त्व सांगितलं. रोजच्या पोषण आहारात वापरला जाणारा भाजीपाला चांगल्या दर्जाचा हवा या उद्देशाने परसबागेचा पर्याय सुचवला. बागेचं प्रात्येक्षिकही दाखवलं.
मग, या बागेसाठी मुख्याध्यापकांनी लगेच मंजुरी दिली. त्यानंतर शाळेचे शिक्षक, विद्यार्थी यांनी लगेचच बाग तयार करायला घेतली. शिक्षक-विद्यार्थ्यांसोबत स्थानिक लोकप्रतिनिधी शिक्षण विभागाचे अधिकारी यांनीही श्रमदान करून एका दिवसात बाग तयार केली. आता पेरणीसाठी सर्व तयारी झाली आहे.
रिलायन्स फाउंडेशन आणि शिक्षण विभागानं परसबागेसाठी शाळेला मार्गदर्शक पुस्तिका दिली. त्यानुसार त्यांनी बाग तयार करण्यासाठी ३० बाय ३० फूट जागेत एक गोलाकार आराखडा तयार केला. १ ट्रॉली खत, माती आणून पसरली आणि विटा लावून कुंपण केलं. या बागेत बाहेरील गोलामध्ये शेवगा, मधल्या टप्य्यात वांगी, टोमॅटो, मध्यभागी भाजीपाला पिकवला जाणार आहे. आणि याचा वापर विदयार्थ्यांच्या पोषण आहारात केला जाणार आहे. शाळेचे मुख्याध्यापक मुकुंद सूर्यवंशी सांगतात, “बागेचं काम सुरू असताना मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा होता. आणि त्यापेक्षा जास्त आनंद बाग बनवून झाल्या नंतर पाहायला मिळाला. त्याचबरोबर ही बाग तयार करण्यासाठी जिल्हापरिषदेने ५ हजार रूपयांचा चेकसुद्धा दिला. शाळेतील मुलांच्या परीक्षा संपल्यानंतर उन्हाळ्याच्या सुट्टीत ही बाग तयार झाली.”
उन्हाळी सुट्टीत परसबाग केली
पावसात ती भाजीने फुलली.
व्हिडीआे लिंक : https://www.facebook.com/watch/?v=303422100612376

- निलेश शेवाळे, कोल्हापूर

No comments:

Post a Comment