Saturday 25 January 2020

चला, मुलगे घडवूया (भाग सात)

आज जे आपल्या अवती भवती घडतंय ते खूपचं अस्वस्थ करणारं आहे. माझा मुलगा समर्थ ६.५ वर्षाचा आहे ,म्हटलं तर बराच लहान आहे हे समजण्यासाठी. तो ३-४ वर्षाचा असताना त्याने मला प्रश्न विचाराला मम्मा, मुली पण बाईक चालवतात का? तेव्हा मी म्हणाले, "समर्थ मुलगे काय कि मुली, कोणीही बाईक चालवू शकतं. हे काम मुलग्याचं नि हे मुलीचे असं काही नसतं."
समर्थला मला घरातल्या कामात मदत करायला आवडते. तो छान कपड्यांच्या घड्या करतो, स्वयंपाक घरात मस्त लुडबुड करतो.मला वाटाणा सोलायला दे असं तो काम मागून घेतो. आजी-आजोबांची काळजी घेतो. हे काम मुलीचं असं काही आम्ही त्याला सांगत नाही ना असं वर्गीकरण चुकून पण करत नाही. मुलगे आणि मुली असा भेदभाव न करता चांगला माणूस म्हणून माझा मुलगा घडावा हे महत्वाचं !
- मेघना धर्मेश 

No comments:

Post a Comment