Saturday 25 January 2020

चला, मुलगे घडवूया (भाग पाच)


पार्थ आता सातवीत आहे,वय 12. टीन एजचे इफेक्टस हळूहळू दिसताहेत. म्हणजे या वयात आडोलसेन्स जाणवू लागतो मुलांना आणि थोडी बंडखोर होतात. पार्थमध्ये हा बदल स्पष्ट दिसू लागला जेव्हा तो आमच्या बारीक सारीक गोष्टी ऐकणे सोडून त्यावर प्रश्न उपस्थित करू लागला. उलट बोलणंही थोडं वाढलंय. पण आम्ही यावर तो विषय सोडून इतर गोष्टीत त्याला चर्चेत सामावून घेणं सुरू केलं. 
रेप वगैरेच्या बातम्या लागल्या की अजूनही आम्ही चॅनेल बदलतो. तोही त्यावर प्रश्न विचारत नाही,चर्चेतून त्याला कळतं की हे काहीतरी चुकीचं केलं गेलंय मुलींबाबत.
त्याला मागील वर्षी नागरिकशास्त्रात भेदभाव हा विषय होता, ज्यात लिंग भेद शिकवला. त्याचा उलटा परिणाम असा झाला की तो भेदभाव बोलण्यातून बोलून दाखवू लागला. म्हणजे उदा. मम्मी काम नाही करत,आपण दिवसभर बाहेर राहतो, काम करतो, हिला दिवसभर घरी बसायला मिळतं, मम्मीला का विचारता, ती कुठे कमावते, मुली ओव्हर स्टाईल करतात इत्यादी. हे आमच्यासाठी आश्चर्यकारक होतं. थोडा वेळ समजावलं,पण बोलणं तसेच येऊ लागले. मग लक्षात आलं की याला त्याची आई जे करतेय ते तिचं कर्तव्य आहे असं वाटतंय आणि कष्ट नाही वाटत. त्याला ते छोट्या छोट्या उदाहरणातून समजावून सांगितलं. त्यासाठी आधार त्याच्या आजीच्या उदाहरणाचा केला,कारण तिथं तो भावनिकदृष्ट्या जोडलेला आहे. प्रत्येक काम कसं महत्त्वाचं आहे आणि त्याला आदर देणं हे गरजेचं आहे हे समजावलं, अजूनही हळुवार सांगत असतोच. बिल्डिंगमध्ये कोणीही मुली पार्थच्या सवंगडी नाहीत,आणि शाळेतही, त्यामुळेही मुलींबद्दल पुर्वग्रह झाला असावा. त्यासाठी त्याच्या टीचरना सांगून सिटिंग अरेंजमेंट बदलली. कल्पना चावला हा त्याच्या अभ्यासक्रमातील विषय आमच्या मदतीस आला, ज्यातून मुलीही समान अचिवमेंट करू शकतात हे त्याच्या लक्षात आलं.
सतत संवादी राहणं, आवश्यक तितकाच आणि योग्य कार्यक्रम टीव्हीवर पाहणे, अभ्यासाचं प्रेशर न देणे, त्यासोबत व्यक्तिमत्व कम्पोज्ड करणे यावर भर देण्याचा प्रयत्न करतोय.
वाद होतात,त्याच्यासमोर टाळणे पाळतोय.
सध्या तरी इतकंच.
त्याला गोष्टी समजत जातील तसे अजून संवादी राहणं.
स्त्री बद्दल तिचं स्वतंत्र अस्तित्व मान्य केलं की बरेच प्रश्न सुटतील. गृहिणी असो किंवा वर्किंग वूमन त्यांना स्वातंत्र्य आहे, अस्तित्व आहे,अपेक्षा आहेत. प्रत्येक स्त्रिला तिच्याबद्दल निर्णयाचे अधिकार आहे हे मनात रुतले की स्त्रीबद्दल आदर आणि समान वागणूक सर्व होतं. 

- अमोल पाटील

No comments:

Post a Comment