Saturday 25 January 2020

बालमजुरी जनजागृती रॅली अन‌् चर्चा

रायगड जिल्हा बालमजुरीपासून मुक्त करण्यासाठी रायगडच्या कामगार उपायुक्त कार्यालयानं पनवेलमध्ये जनजागृती रॅली काढली होती. या रॅलीत रायगड सुरक्षारक्षक मंडळाचे सुरक्षारक्षक, महिला आणि बालविकास विभागाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. यावेळी रायगडचे कामगार उपायुक्त प्रदीप पवार यांच्यासह कामगार उपायुक्त कार्यालयातील सहकारी उपस्थित होते. 
''बालमजुरीविरोधात केंद्र शासनानं १९८६ मध्ये कायदा आणला. नुकत्याच त्यात सुधारणाही झाल्या. मात्र बालमजुरी रोखण्यासाठी केवळ शासनस्तरावर प्रयत्न पुरेसे नाहीत. तर जनतेचा सहभाग आवश्यक आहे, असं पवार यांनी सांगितलं.
''बाहेरून येणाऱ्या मुलांना जिल्ह्यातल्या आस्थापनांमध्ये, दुकानांमध्ये मजूर म्हणून ठेवलं जाऊ नये, यासाठी जनजागृती सुरू आहे. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे''. असं बालमजुरी विरोधी कृती दलाच्या सदस्य स्मिता काळे यांनी सांगितलं. 
#नवीउमेद #रायगड 
Adv Kadambari Kale


व्हिडीओ लिंक : https://www.facebook.com/watch/?v=797082727387680

No comments:

Post a Comment