Saturday 25 January 2020

बबलू पानवाला ...

पुण्यातला प्रसिद्ध फर्ग्युसन रस्ता. इथल्या रूपाली हॉटेलजवळ पानाचं एक दुकान. खरंतर सगळ्याच हॉटेलजवळ पानवाले बघायला मिळतात. गर्दीही असतेच. पण या बबलू पानवाल्याची गोष्टच निराळी आहे. इथं तंबाखू, सुपारी मिश्रित पान मिळत नाही. तर इथलं पान आगळंवेगळं आहे. ते आहे चॉकलेटचं. असं हे चॉकलेटचं पान खायला खास गर्दी जमते ते कॉलेजला जाणाऱ्या मुलामुलींची.
सोनाली पान स्टॉल असं त्याचं नाव. एका पायाने दिव्यांग बबलू यादव इलाहाबादजवळच्या एका खेड्यातून पुण्यात आला. पुण्यात येऊन आता त्याला 12 वर्ष झाली. कामधंदा शोधता शोधता एका पानस्टॉलवर त्याला काम मिळालं. इथं काम करतानाच त्याने प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. बबलू म्हणतो, “माझ्या स्टॉलवर फक्त मीठा पान मिळतं, इतर वस्तू मिळत नाहीत. म्हणूनच मुली स्वतःही पान घ्यायला स्टॉलवर येऊ शकतात.”
आज बबलूचा पान स्टॉल जोरात सुरू आहे. महिन्याकाठी दहा हजार भाडं जाऊन तो दर दिवसाला एक -दोन हजार रूपये मिळवू लागला आहे.
#नवीउमेद
- गणेश रामनाथ धराडे

No comments:

Post a Comment