Saturday 25 January 2020

आतोणे शाळेसाठी योगदान

#आतोणेशाळेसाठीयोगदान अपडेट ( ४ डिसें १९)
आजपर्यंत जमा निधी : रु 19,500/-
योगदान देणारे मित्रमैत्रिणी आणि त्यांनी पाठवलेली रक्कम
ll नरेंद्र गंगाखेडकर Narendra Gangakhedkar दहा हजार ll
ll माधवी कुळकर्णी Madhavi Kulkarni आणि मीना कुळकर्णी प्रत्येकी दोन हजार ll
ll सुजाता मेकडे @Sujata Mekde
१ हजार,पाचशे ll
ll प्रत्येकी एक हजार देणारे
विवेक पोटे, पिनाकिन तेंडुलकर, शोभा शाळीग्राम Shobha Shaligram ll
..
नवी उमेद वाचकांच्या सहकार्याने या शाळेला मदत करण्याची जबाबदारी सध्या, डिसें १९ पासून एप्रिल २० पर्यंत, एकूण ५ महिन्यांसाठी आम्ही घेत आहे. (पुढील काळाचा निर्णय तुमचा प्रतिसाद पाहून घेणार आहोत.)
१) शाळेसाठी दोन वर्गखोल्या, सध्या झोपडीत भरणार्‍या अंगणवाडीसाठी खोली
ग्रामपंचायत आणि शाळाव्यवस्थापनसमिती यांनी यासाठी अर्ज केला आहे. ही शासनाची जबाबदारी असल्याने, त्यासाठी संबंधित यंत्रणा, लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा संपर्क करेल. त्यात कुणी मदत करत असल्यास स्वागत आहे.
२) स्वच्छता किट
मुलांना प्रत्येकी एक स्वच्छता किट दिल्यास बरं राहील. यात टूथपेस्ट, टूथब्रश, साबण, शांपू, तेल, कंगवा, नॅपकिन या वस्तू असाव्यात.
II ५९ मुलांसाठी हे स्वच्छता किट टीम #नवीउमेद च्या अर्थिक योगदानातून पुरवणार आहोत II
३) बाकं
आत्ताची १० बाकं ५९ मुलांना बसण्यासाठी कमी पडत होती. मात्र, उर्वरित २० बाकांचा पुरवठा शासनाकडून होऊ घातला आहे, असं समजतं. त्याची वाट बघूया.
४) शैक्षणिक खेळाचं साहित्य
मुलांना शिक्षणासाठी खेळाच्या साहित्याची गरज आहे. हे कुणी देणगीदाखल दिल्यास स्वागत.
५) टॅब
शाळेला १० ते १५ टॅब उपलब्ध झाल्यास चांगलं होईल. स्वतः जाधव आणि अब्दागिरे सर तंत्रज्ञानाचा कल्पक उपयोग मुलांना शिकवण्यासाठी करत असतात. देणगीदाखल टॅब देणार्‍यांचं स्वागत आहे.
६) वैद्यकीय तपासणी
शासनातर्फे जाने १९ मध्ये मुलांची तपासणी झाली आहे. त्यानंतर आजपर्यंत झाली नाही. यासाठी कुणी डॉक्टर्स पुढाकार घेत असतील, तर खूप चांगलं होईल. अशांचंही स्वागत.
७) पोषण आहार शाळेतील ५९ विद्यार्थी + अंगणवाडीतील ३७ बाळं यांच्यासाठी (फोटो क्र १०,११)
सद्यस्थिती अशी -
शाळेला शासनाकडून प्रति विद्यार्थी २० ग्रॅम कडधान्य, १०० ग्रॅम तांदूळ आणि थोडा मसाला पुरवला जातो. प्रति विद्यार्थी १.५७ रु भाजीपाला, इंधन खर्च यासाठी दिले जातात. आठवड्यातून एक दिवस प्रत्येक मुलाला ३ बिस्कीटं किंवा १ केळं पुरवलं जातं. अंगणवाडीत भात वा खिचडी, उसळ, लाप्शी हे आलटून पालटून आणि अधनंमधनं गोड भात हे पदार्थ दिले जातात.
उघडच आहे की, शाळेत आणि अंगणवाडीत दिला जाणारा हा आहार पुरेसा नाही. जाधव सरांच्या आणि ग्रामस्थांच्या प्रयत्नांतून आठवड्यातले २-३ दिवस काही व्यक्ती, संस्था आहार जरूर पुरवतात.
**यात सातत्य राखण्यासाठी नवी उमेदच्या वाचकांची मदत मागत आहोत**
आठवड्यातले ३ ते ४ दिवस अंडी, केळी वा अन्य फळं आणि ग्लुकोज बिस्किटं ९६ मुलांना मिळण्यासाठी रु २ हजार रु पुरेसे आहेत. म्हणजे महिन्याला ८ हजार रु.
सध्या ठरवलेल्या ५ महिन्यांसाठी आत्ता ४० हजार रु. जमा करणं गरजेचं आहे.
II म्हणजे, फक्त ४० व्यक्तींनी प्रत्येकी एक हजार रु दिले तर या ९६ मुलांच्या पाच महिन्यांच्या आहाराची सोय सहज होईल. आणखी व्यक्तींनी मदत केल्यास या ९६ मुलांच्या वर्षभराच्या आहार-पुरवठ्याची जबाबदारी आपण घेऊ शकतो II
आहारासाठीची रक्कम संपर्ककडे जमा करावी. प्रत्येक रकमेची पावती संपर्ककडून पाठवली जाईल. आणि देणगीदारांची नावं आणि त्यांनी दिलेली रक्कम इथे शेअरदेखील केली जाईल. अकाऊंटचा तपशील असा:
Account name: SAMPARK
Bank of Baroda, BACKBAY RECLAIMATION BRANCH
Account no: 03820100004549
IFSC code BARB0BACKBA (मधला आकडा शून्य आहे)
Type of Account: Saving
पैसे पाठवल्यानंतर इथेच कमेंटमध्ये रक्कम कळवावी. इनबॉक्समध्येही संपर्क करू शकता.
शैक्षणिक खेळाचं साहित्य, टॅब आणि वैद्यकीय तपासणी यात मदत करू इच्छिणार्‍यांनी कृपया इथेच कमेंटमध्ये तसं लिहावं.
आपले विश्वासू,
- वर्षा जोशी आठवले, लता परब, मृणालिनी जोग, हेमंत कर्णिक आणि मेधा कुळकर्णी. (नवी उमेद आणि संपर्क)

No comments:

Post a Comment