Saturday 25 January 2020

टाईम पर्सन ऑफ द इयर - ग्रेट ग्रेटा

२०१८ मध्ये, वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी ती सर्वप्रथम उजेडात आली. तिने शाळेत गैरहजर राहून स्वीडनच्या संसदेबाहेर बसून पर्यावरणीय असंतुलनविषयी सरकारने काही ठोस उपाय करावे, म्हणून तिने सह्यांची मोहीम उघडली. तो होता शुक्रवार. तिला जगभरातून लाखो विद्यार्थ्याचा पाठिंबा मिळाला. आणि या चळवळीला "भविष्यासाठी शुक्रवार" असे नाव दिले गेले. 
आज ही ग्रेटा टाईम पर्सन आॅफ द इयर 19 ठरली आहे.
ग्रेटाचा जन्म ३ जानेवारी २००३ रोजी स्टॉकहोम (स्वीडन)येथे झाला. विद्यार्थीदशेत असतानाच वयाच्या ११व्या वर्षांपासून हवामानबदलाचा अभ्यास करून त्याच्या होणाऱ्या वाईट परीणामाची जाणीव जगाला करून देण्यासाठी तिने हवामानातील बदल ही चळवळ सुरू केली. आणि तिच्या कामाची आंतरराष्ट्रीय पातळीवर नोंद झाली.
ग्रेटाने सुरू केलेल्या चळवळींचे नाव पर्यावरणीय बदलासाठी शालेय संप असे आहे.
तिच्या आईचे नाव मालेना इरमन व वडिलांचे नाव स्वांते थनबर्ग असे आहे. आई प्रख्यात औपेरा गायिका तर वडील प्रख्यात नट आहेत.आजोबांचे नाव ओलेफ थनबार्ग असून तेही प्रसिध्द दिग्दर्शक आहेत. या घरातील सर्वांचा तिच्या कामाला पाठिंबा आहे.
तिचे पर्यावरणविषयक म्हणणे ती विज्ञान व सत्यस्थिती याची सांगड घालून मांडते. मोठमोठ्या राजकीय व सामाजिक नेत्यांना ती बेधडकणे आवाहन करते.
२०१८ साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरणीय परिषदेत तिने भाग घेतला व भाषण सुद्धा केले. आणि मग अचानक दर शुक्रवारी जगाच्या कानाकोपऱ्यातून शाळांचा संप सुरू झाला आणि या संपात विविध शहरातून लाखो मुलांनी भाग घेतला.
ग्रेटाने विद्यार्थ्यांच्या पालकांना पर्यावरणपूरक जीवनशैलीवर कसा भर द्यावा याबद्दल मार्गदर्शन केले.
२०१९ च्या मे महिन्यांत तिचे नाव जागतिक प्रकाशझोतात आले.टाईम मासिकाने तिची नोंद "भावी पिढीचे नेतृत्व" अशी केली. लोक तिला आदर्श मानू लागले. प्रसारमाध्यमांनी तिची प्रतिमा उंचीवर नेऊन ठेवली.
ग्रेटाला तिच्या कामासाठी खूप बक्षिसे मिळाली आहेत. सप्टेंबर २०१९ मध्ये संयुक्त राष्ट्र संघाला तिने पर्यावरणीय धोरणावर संबोधित केले. २०१९ मध्ये नोबेल शांतता पुरस्कारासाठी तिचे नामांकन झाले.
अशी ही ग्रेटा अवघी १६ वर्षाच्या वयात भविष्यातील पर्यावरणीय संकटांची अभ्यासक व कृतीशील कार्यकर्ता आहे. तिच्यापुढे डोनाल्ड ट्रम्पसारखे सर्वशक्तिमान नेते हतबल आहेत. नुकतेच इंग्लंडच्या राजपुत्राने तिच्या कामाचे कौतुक करून तिच्या कामाला पाठिंबा व्यक्त केला आहे.
आपल्याला ग्रेटाकडून शिकण्यासारखं खूपच आहे.
#नवीउमेद

No comments:

Post a Comment