Friday 10 January 2020

सुश्मिता आणि तिची लेक (बातम्या मुलांच्या : तुमच्या आणि आमच्या )

बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेनने २००० साली रेने आणि २०१० साली अलिशा या दोन मुलींना दत्तक घेतलं. सुश्मिता तिच्या दोन्ही मुलींवर जीवापाड प्रेम करते. सुष्मीताने सोशल मीडियावर तिच्या १० वर्षांच्या चिमुकल्या आलिशाचा एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये आलिशा, अडॉप्शनवर लिहीलेलं एक पत्र वाचताना दिसत आहे. “आलिशाने हे पत्र वाचल्याने माझ्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या”, असं कॅप्शन सुश्मिताने या व्हिडीओला दिलं आहे.
सुश्मिताचं बाई सारंच वेगळं असतं. ती सेलिब्रिटी आहे. तिला काय बाई... असं म्हणून तिच्या या दत्तक घेण्याकडे आणि तिचं तिच्या मुलींबरोबरच असलेल्या नात्याकडे वरपांगी बघणं अन्यायकारक होईल. तिच्यातल्या मानवी मूल्य जपण्याच्या गुणांकडे दुर्लक्षित केल्यासारखं होईल.
माझं बालपण जसं सुखात गेलं तसं अनेकांचं गेलं असणार. पण आपण कधी आईवडिलांना समोर बसवून त्यांच्या बद्दलची कृतज्ञता व्यक्त केली, असं कधी मी कोणाकडून ऐकलंही नाही. सुश्मिताने दत्तक घेणं हे कौतुकास्पदच पण तिच्या मुलींना याची कल्पना असून त्या तिला समोर बसवून त्याबद्दल आभार व्यक्त करतात खरंच हे खूपच सुंदर आहे.
मुलांच्या संगोपनात अनेक गोष्टी घडत असतात. आईवडील आपआपल्या स्वभावानुसार त्यांना घडवत असतात. त्यातून मुलांचा स्वभाव तयार होतो.
तरीही, आपल्या मुलांनी आपल्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणं किती सुखावह, नाही का!
मुलांनी आपल्याला असं समोर बसवून आभार व्यक्त करणं, हे सगळयांनाच आवडेल असं नाही. आपल्या चौकटीत बसलं नाही, तरी प्रेम व्यक्त करणं ही एक चांगली पध्दत आहे, ही एक हेल्दी प्रोसेस आहे. आणि आपल्या मुलांनी असं व्यक्त व्हावं हे सगळयांनाच हवंहवंसं वाटणारच.

https://www.instagram.com/p/B4sjxseBWDn/?utm_source=ig_embed
- लता परब
 

No comments:

Post a Comment