Saturday 25 January 2020

चला, मुलगे घडवूया (भाग दोन)

हैदराबादेतील बलात्कार, आरोपींची अटक या बातम्या खरे म्हणजे मी काही विशेष लक्ष देऊन follow करत नव्हते. बलात्कारपीडित मुलीबद्दल सहानुभूती नव्हती म्हणून नव्हे, तर अशा मन उद्विग्न करणाऱ्या बातम्या मी वाचायच्याच टाळते. फार अस्वस्थ वाटते. हे सगळं आपण बदलू शकत नाही यामुळे हतबलता वाटत रहाते, कामात लक्ष लागत नाही. 
आणि जोपर्यंत पुरुषांच्या मानसिकतेत आणि समाजाचा मुलींकडे पाहण्याच्या, त्यांच्या वर्तणुकीवर ताशेरे ओढण्याच्या, त्यांच्या लहानसहान कृतींमधून त्यांना judge करण्याच्या वृत्तीमध्ये बदल होत नाही तोपर्यंत या आणि अशा घटना घडतच रहाणार असं मला वाटतं.
एकदा याच विषयावर मी आणि माझी मोठी बहीण अश्विनी गप्पा मारत असताना स्त्री पुरुष लैंगिक संबंधामध्ये पुरुषांना त्याचे काहीच परिणाम भोगावे लागत नसल्यामुळेच ते सोकावतात यावर आमचे एकमत झाले. आणि आपल्या मुलांची अशी मनोवृत्ती होऊ नये याची आपणच आत्तापासूनच काळजी घेतली पाहिजे, हे आम्हाला जाणवले. त्यातून हल्ली मुले मुली खूप सहजरित्या sexual relationship मध्ये पडतात, असे लक्षात येते. त्यामुळे वाढत्या वयातच काही गोष्टींची जाणीव आपल्या मुलांना करून द्यायला हवी असं आमच्या लक्षात आले.
मला एक मुलगा आणि एक मुलगी आहेत तर माझ्या मोठ्या बहिणीला, अश्विनीला दोन मुलगे आहेत. तिचा मोठा मुलगा माझ्या मुलापेक्षा ६ वर्षांनी मोठा असल्यामुळे, त्याच्याबरोबर स्त्री पुरुष संबंध या विषयावर तिच्या गप्पा सुरु झाल्याच होत्या.
त्यावेळेस तिने आणि नंतर मीही आमच्या मुलांशी गप्पा मारताना त्यांच्या हे लक्षात आणून दिले की consensual sexual relationship मध्येसुद्धा परिणाम (म्हणजेच नको असलेली pregnancy) ही मुलीच्याच वाट्याला येते. म्हणूनच as an equal and willing partner हे परिणाम टाळण्याची जबाबदारी ही मुख्यतः मुलाचीच आहे. As a man, the onus of responsibility lies on him. या कारणामुळेच, तिच्या बरोबरीने परिणाम भोगणायची तयारीही तुला ठेवावी लागेल आणि आपल्या partner चा जो निर्णय असेल त्याला तुला पाठिंबा द्यावाच लागेल.
आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे जर माझ्या असं लक्षात आले की तू आपली जबाबदारी टाळायचा प्रयत्न करतो आहेस तर, तुझी आई असल्यामुळे मी तुलाच support करीन या भ्रमात तू राहू नकोस.
आमच्या या सांगण्याचा त्यांच्या भावी आयुष्यावर काय परिणाम होईल हे माहित नाही, पण बहुदा आमची मते मुलग्यांनी स्वीकारली असावीत कारण ती सहसा मुलींच्या दिसण्यावर, कपड्यांवर, त्यांच्या वागण्यावर ताशेरे ओढताना दिसत नाहीत. आणि समाधानाची गोष्ट अशी की मुलींबद्दल अशा अधिकारवाणीने (तो त्यांना कोणीही दिला नसताना) बोलणाऱ्यांबद्दल त्यांना आमच्या इतकंच आश्चर्य वाटते.
- मृणालिनी जोग

#नवीउमेद #उन्नाव #हैद्राबाद

No comments:

Post a Comment