Saturday 25 January 2020

चला, मुलगे घडवूया (भाग चार)

'नवी उमेद'ने या विषयावर मनोगत लिहून पाठवायला सांगितलं, तेव्हा प्रथम मनात विचार आला की मूल संस्काराच्या नावाखाली पाजलेल्या उपदेशाच्या डोसाने घडते की पालकांचे वागणे बघून आपोआप चाांगले संस्कार त्याच्यात झिरपतात. या विचाराने माझ्या बालपणात शिरले. तो काळ होता, मुलींनी 'सातच्या आत घरात' परतायचं, या विचारांचा. त्या काळातही, माझ्या वडिलांनी माझ्यावर मुलगी म्हणून कोणतीही बंधने घातली नाहीत, की भावाला विशेष वागणूक दिली नाही. घरातूनच हे बाळकडूमिळाल्याने, मला मुलगा झाल्यावर काही वेगळं वाटलंच नाही. माझा मुलगा आणि मुलगी कोणत्याही भेदभावाशिवाय वाढले. त्यामुळे, माझ्या मुलाला पुरुषी अहंकाराचा स्पर्श झालाच नाही. त्याच्या मनावर स्त्रीही प्रथम माणूस असते, तिला स्वतंत्र अस्तित्व असतं, तिचे स्वतःचे असे विचार असतात हे पक्के ठसले. तो वयात आल्यापासून माझ्याशी जितका रोजच्या घडामोडींवर चर्चा करू शकतो, तितक्याच मोकळेपणाने 'सेक्स' या विषयावर बोलू शकतो. त्याला आजीचे डायपर बदलायलाही संकोच वाटत नाही. आता त्याने चाळीशी पार केली आहे. मला त्याचा अभिमान आहे कारण तो खरोखर 'उत्तम माणूस' आहे.
यापरते वेगळे संस्कार काय असू शकतात?
- सुषमा देसाई 

No comments:

Post a Comment