Saturday 25 January 2020

मुलींच्या सुरक्षिततेसाठी असाही उपक्रम...

जिल्हा उस्मानाबाद, तालुका लोहारा इथल्या मौजे उदतपूर या गावातली ही गोष्ट. गावचे सरपंच माधवराव पाटील सांगतात की, सरपंच झालो तेव्हा गावातले काही प्रश्न समोर होतेच. पण सर्वांत महत्त्वाचा प्रश्न मुलींची सुरक्षितता कशी वाढवता हेईल हा होता. त्यामुळे ग्रामपंचायतीमार्फत काही करता येईल का याचा विचार सुरू झाला. मग गावातल्या मुलींसाठी ग्रामपंचायतीतच अभ्यासिका सुरू केली. वेळ होती संध्याकळी 6 ते 8.45 पर्यंतची. मुली एकट्या संध्याकाळीही बाहेर पडाव्यात, एकट्याने घरापर्यंत जाव्यात, त्यांना धीट कसं बनवता येईल हा विचार त्यामागे होता. सुरूवातीला मुलींची संख्या होती केवळ 7 ते 8. आज मात्र रोज 25 ते 30 मुली इथं अभ्यासासाठी हजेरी लावताना दिसत आहेत, असं सरपंच सांगतात. आणि त्यांच्या पालकांची कुठली तक्रार तर नाहीच उलट मुलींचा अभ्यास होत असल्याने ते समाधानी आहेत.
व्हिडीओ लिंक : https://www.facebook.com/watch/?v=1596710717136090
#नवीउमेद #उस्मानाबाद

No comments:

Post a Comment