Saturday 25 January 2020

मुलांसोबत एक तास, सई तांबे

अन्वयला पोटात असल्यापासून आम्ही त्याला ज्योडी म्हणतो ( पाडस या पुस्तकातलं मुख्य पात्र ) आता तो ४ वर्षांचा झालाय. आणि त्याच्यासोबत वेगवेगळ्या गोष्टी करताना - आपलं बालपण परत आल्यासारखं वाटत. त्याला मोबाईल द्यायचा नाही हे मी व निखिलने मिळून आधीच ठरवलं होतं. त्याने त्याचे खेळ शोध अनुभवावा, भरपुर गप्पा माराव्यात - चित्र पाहावीत. त्याने आणि आपण एकत्र मिळून मज्जा करावी असं वाटायचं आणि मग त्याच्यासोबत हे सगळं करण्याचे रस्ते आम्ही शोधात गेलो. आता आम्ही गोष्टींची नाटकं करतो, काहीवेळा पात्र ज्योडू ठरवतो - आणि मग गप्पा मारताना नवीन गोष्ट तयार होत जाते. कधी मिळून चित्र काढतो, तर कधी मिळून मटार सोलतो आणि रिकाम्या मटारच्या शेंगांपासून आकार बनवतो. किचनमध्ये काम करताना मी आवर्जून त्याची मदत घेते - कुठल्या डब्यात काय आहे, चहा कसा करतात - अश्या काही गोष्टी त्याला समजतात. घरात गोष्टीची भरपूर पुस्तकं आहेत - ती वाचायला ( चित्र वाचन ), त्यावरून स्वतः गोष्ट तयार करायला त्याला आवडते. बाहेर जाताना पण - रस्त्यात कोणाला काय दिसतंय - ते सांगायचा खेळ आम्ही खेळतो - उदा - पिवळी गाडी, नारळाचं झाड.
हे खेळ आपल्याला पण मुलांइतकंच समृद्ध करतात. त्यांच्या जगात आपल्याला मुक्त प्रवेश देतात. आई म्हणून ... त्याच्या सोबत खेळताना, खेळण्यांतून त्याचे विचार, कल्पना ऐकताना होणारा आनंद शब्दात सांगणं खरंच अवघड आहे. 

llभाग 1ll

- सई तांबे

व्हिडीआे लिंक : https://www.facebook.com/watch/?v=2597565107138323

No comments:

Post a Comment