Friday 10 January 2020

हे असंच चालू राहिलं तर...' पथकानं समजावलं न मुलीनं तक्रार केली


''देवळाली कॅम्प परिसरात एका विद्यालयात छेडछाड होत होती. आमचं पथक शहानिशा करण्यासाठी गेलं. त्यांनी आमच्या महिला कर्मचाऱ्यांनीही छेड काढली. समज द्यायचा प्रयत्न केला पण त्यांची अरेरावी सुरूच राहिली तेव्हा धिंड काढत देवळाली पोलीस ठाण्यात आणलं आणि गुन्हा दाखल केला. '' नाशिक पोलीस आयुक्तालयातील निर्भया पथकाच्या समन्वयक भावना महाजन सांगत होत्या.
नाशिक शहर परिसरातील महाविद्याालयं, विद्याालयं , सोमेश्वार धबधबा, फाळके स्मारक, बालाजी मंदिर यासह सिनेमागृहांसह अन्य सार्वजनिक ठिकाणी युवती- विद्याार्थींनीची छेड काढण्याचे प्रकार नेहमी घडतात. पण महिला असो वा युवती तक्रार करण्यास पुढे येत नाही. यामुळे गुन्हेगारांची हिंमत वाढत जाते. ही परिस्थिती बदलण्यासाठी पोलीस आयुक्त विश्वाास नांगरे पाटील यांनी निर्भया पथक ही संकल्पना मांडली.
पोलीस आयुक्तालयातील महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचाºयांना त्या दृष्टीनं आवश्यक प्रशिक्षण देण्यात आलं. यंदाच्या जून महिन्यात शहराच्या चारही विभागात आठ निर्भया पथक नियुक्त झाली. सकाळी सहा ते दुपारी तीन आणि दुपारी तीन ते रात्री बारा या दोन सत्रात पथकाचं काम चालतं.
''तक्रारीसाठी मुली पुढे येत नाहीत कारण त्यांना समाजकंटकांची भीती वाटत असते.'' भावना मॅडम सांगत होत्या. '' निर्भया पथकाकडे येणाऱ्या तक्रारीत तक्रारदाराचं नाव कधीच समोर येत नाही. ''
संशयितांवर थेट कारवाईचा बडगा उगारण्याआधी त्याला समज दिली जाते. यानंतर त्याचा विक्षीप्तपणा कायम राहिला तर त्याला न्यायालयात हजर करत मुंबई पोलीस कायद्यााअंतर्गत गुन्हा दाखल केला जातो. यानंतरही छेडछाड सुरूच राहिली तर दंडात्मक कारवाई आणि तुरुंगवासाची तरतूद असलेल्या भारतीय दंड विधान कलम ५०९ अंतर्गत त्याच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होतो. महिन्याभरातच १० मुलांवर दंडात्मक कारवाई झाली.
कारवाईसोबतच पथकाची माहिती व्हावी यासाठी प्रयत्न सुरू असतात. शाळा- महाविद्यालयांमध्ये माहिती दिली जाते. सिनेमागृहांमध्ये पत्रकं वाटली जातात. हेल्पलाईनसह अन्य क्रमांक वारंवार प्रसिद्ध केले जातात. तक्रार करण्यासाठी स्त्रियांनी पुढे यावं, त्यांचं मनोबल वाढावं यासाठी समुपदेशन केलं जातं.
चालू रिक्षेत रिक्षाचालकानं युवतीची छेड काढली. तिने रिक्षेतून उडी मारली. घाबरलेली मुलगी तक्रार करण्यास तयार नव्हती. निर्भया पथकानं धीर दिला, समजावलं , ' हे असंच चालू राहिलं तर... ' . मुलीनं तक्रार केली आणि अवघ्या काही तासात पोलिसांनी रिक्षाचालकाला ताब्यात घेतलं. प्रबोधनाचे परिणामही दिसून येत आहेत. सुरुवातीला प्रत्येक पथकाला महिन्याला साधारण २० तक्रारी प्राप्त व्हायच्या. आता प्रत्येक पथकाला दिवसाला किमान ५ कॉल्स येतात.
#नवीउमेद #नाशिक

- प्राची उन्मेष, नाशिक  

No comments:

Post a Comment